Saturday, August 26, 2023

हसन मुश्रीफ म्हणाले, लोक जितेंद्र आव्हाडांना कोल्हापुरी पायताणाने हाणतील ;

वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरमधील सभेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर ‘मी नाय त्यातली.. म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या लपवलेल्या गोष्टी बाहेर आल्यावर लोक त्यांना  कोल्हापुरी पायताणाने हाणतील,’ अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रीफ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे माझ्यापेक्षा खूप लहान आहेत. त्यांनी शरद पवारांवार काय जादू केली, माहीत नाही. मात्र, ठाण्यातील पक्ष संपविण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी अजित पवार, आमच्याबद्दल असं बोलू नये. आम्ही सत्तेत येण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यावर 53 आमदारांच्या सह्या होत्या. त्यात जितेंद्र आव्हाड यांचीही स्वाक्षरी होती. आव्हाडांनी कोल्हापुरी पायतानाची भाषा वापरल्यानंतर आम्हाला कापशीचं पायतान काढावं लागलं, ती बसल्यावर कळेल, अशी कडवट प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment