Tuesday, August 29, 2023

मोठी बातमी ; घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 200 रुपयांनी स्वस्त होणार ;

वेध माझा ऑनलाईन। महागाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आता घरगुती गॅस सिलेंडर तब्बल 200 रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर केंद्राने याबाबत निर्णय घेत महिलांना मोठं गिफ्ट दिले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या देशात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडूनअनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आता रक्षाबंधनच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना विशेष भेट दिली आहे. केंद्र सरकारकडून घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे देशभरातील महिला वर्ग चांगलाच खुश असणार आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1100 ते 1200 रुपये एवढा आहे. मात्र आता या किमतीमध्ये 200 रुपयांनी घट होणार आहे. ज्याचा मोठा फायदा नागरिकांना होईल.


No comments:

Post a Comment