वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे उद्या शुक्रवारी माणच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते दहिवडी नगरपंचायतीच्या नुतन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. मात्र, या अगोदरच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन नगरपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन एका तृतीय पंथीयाच्या हस्ते केले आहे. यामुळे दहिवडी येथे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. उद्या या इमारतीचे उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दहिवडी नगरपंचायतीच्या इमारतीसाठी आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने निधी आणला असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सौ. साधना सिद्धार्थ गुंडगे या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष असताना फेब्रुवारी 2017 मध्ये ठराव होऊन दहिवडी नगरपंचायतीची नूतन इमारत उभारण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठी तरतूद करून एक कोटी होऊन अधिक निधीला साधना गुंडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभेत मंजुरी देण्यात आली होती. त्या ठरावाला वैशाली कदम सूचक आणि नलिनी काशीद अनुमोदक होत्या. एप्रिल 2018 मध्ये झालेल्या सभेत आम्ही इमारतीचे बांधकाम कसे करावे, याबाबत आढावा घेतला होता. तर 7 जून 2019 रोजी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते नगरपंचायत इमारतीच्या बांधकामाला शुभारंभ करण्यात आला होता.या इमारतीसाठी ज्यांचे काडी मात्र योगदान नाही ते प्रभाकर देशमुख आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते इमारतींच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे, ते उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आम्ही होऊ नये. यासाठी आज तृतीय पंथीयांच्या हस्ते आम्ही नगरपंचायतीच्या नूतनीमारतीचे उद्घाटन घेत आहोत. असे दहिवडीच्या माजी नगराध्यक्षा सौ. साधना गुंडगे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
No comments:
Post a Comment