वेध माझा ऑनलाईन। कोयनानगरजवळ शुक्रवारी रात्री आयशर- दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले असून एक तरूण गंभीररित्या जखमी झाला आहे. धीरज बनसोडे, प्रणय कांबळे, अशी मृतांची नावे आहेत. दुचाकी चालक प्रसाद कदम हा तरूण गंभीर जखमी असून त्याच्यावर पाटण ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोयनानगरनजीकच्या गोषटवाडी गावच्या हद्दीत एका धोकादायक वळणावर आयशर टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. वाहनांची धडक होताच दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी तरूणाला तातडीने पाटण ग्रामीण रूग्णालयात उपचारसाठी दाखल केले. अपघातानंतर तरूणांच्या नातेवाईक, मित्रमंडळींनी पाटण ग्रामीण रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.
No comments:
Post a Comment