वेध माझा ऑनलाइन। जगातील ४० टक्के तांदूळ निर्यातीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भारताचा एक निर्णय अमेरिकेपासून अरब देशांपर्यंत खळबळ माजवणार आहे. भारताने बिगर बासमती पांढर्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली ते तर तुम्हाला माहीत आहे. तेव्हा बासमती तांदळाच्या निर्यातीला यातून सूट देण्यात आली होती. मात्र जगात पुन्हा एकदा संकट ओढावू शकते, यासाठी भारताने काही खास बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. प्रीमियम बासमती तांदळाच्या नावाखाली पांढर्या बिगर बासमती तांदळाची संभाव्य निर्यात रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी करून सविस्तर माहिती दिली.
‘या’ बासमती तांदळाची निर्यात होणार नाही
मंत्रालयाने रविवारी एक अधिसूचना जारी केली की, आता प्रति टन १२०० डॉलरपेक्षा कमी किमतीचा बासमती तांदूळ देशातून निर्यात केला जाणार नाही आणि मंत्रालयाकडून कोणतीही परवानगी दिली जाणार नाही. भविष्यात APEDA चे अध्यक्ष अशा निर्यात करारांच्या तपासणीसाठी एक समिती स्थापन करतील, जी या करारांचे मूल्यांकन केल्यानंतरच निर्यातीस परवानगी देईल.
No comments:
Post a Comment