Wednesday, August 23, 2023

काही वेळातच चांद्रयान चंद्रावर उतरण्यास सज्ज ! ;

वेध माझा ऑनलाईन । सगळ्या भारतीयांचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान- ३ च्या मोहिमेचा आज निर्णायक टप्पा आहे. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करण्यास सज्ज असून चंद्रावर लँड करणारा भारत चौथा देश ठरणार आहे. याआधी अमेरिका, रशिया, चीन यांनी चंद्रावर यशस्वीपणे लॅंडींग केले आहे. विशेष म्हणजे इस्रोची ही मोहीम खूपच आगळीवेगली आणि ऐतीहासिक असणार आहे. कारण, चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडींग करणार आहे. ही लॅंडींग यशस्वी झाल्यास असे करणारा भारत पहिला देश ठरणार आहे. त्यामुळेच संपूर्ण जगाच्या नजरा आता चांद्रयानकडे वळल्या आहेत.

इस्रोने याआधी केलेल्या चांद्रयान मोहीमा या यशस्वी ठरल्या होत्या. यातील चांद्रयान १ मोहिमतुन चंद्रावर पानी असल्याचा ऐतीहासिक शोध लावण्यात आला होता. तसेच, चांद्रयान २ मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यात येणार होता. यासाठी चंद्राच्या कक्षेत भ्रमण करण्यासाठी ऑरबिटर, विक्रम नामक लँडर आणि प्रज्ञान नामक रोवर् पाठविले गेले होते. परंतु, शेवटच्या क्षणी संपर्क तुटल्यामुळे सॉफ्ट लॅंडींग करताना लँडर आणि रोवर क्रॅश झाले. तरीही, ऑरबिटर अजूनही चंद्राभोवती भ्रमण करीत काम करत असल्यामुळे चांद्रयान २ मोहिमेतुन काही प्रमाणात यश प्राप्त झाले आहे.

No comments:

Post a Comment