Thursday, August 17, 2023

स्वातंत्र्य दिनी कराडच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव कमिटीच्या वतीने संत तुकाराम हायस्कुलमधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप ; शहरात जिलेबी वाटप ; कमिटी अध्यक्ष राहुल भोसले व सहकाऱ्यांनी राबवला स्तुत्य उपक्रम ;

वेध माझा ऑनलाईन । कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनादिवशी येथील संत तुकाराम हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले समितीचे अध्यक्ष राहुल भोसले व त्यांचे सर्व सहकारी मान्यवरांनी हा उपक्रम राबविला 15 ऑगस्ट निमित्ताने घराघरात जिलेबी वाटप देखील यावेळी करण्यात आले
15 ऑगस्ट रोजी सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अध्यक्ष राहुल भोसले व उपाध्यक्ष सुदेश थोरवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब थोरवडे सूर्यकांत थोरवडे चेतन थोरवडे सतीश लादे,आनंदराव लादे,सुनिल थोरवडे,किशोर आठवले गौतम लादे मुबारक आतार अजित भोसले सुमित कांबळे किशोर जाधव महेश थोरवडे दिलीप कांबळे या मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम हायस्कूलमधील  विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जिलेबी वाटप करण्यात आली प्रत्येक घराघरात हे जिलेबी वाटप करण्यात आले देशभक्तीपर गाण्यांची ध्वनिफीत यावेळी लावण्यात आली 

सदर कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीचे,अध्यक्ष राहुल भोसले उपाध्यक्ष सुदेश थोरवडे सचिव संतोष बोलके उपसचिव पंकज काटरे खजिनदार ओमकार थोरवडे उपखजिनदार अभिजीत थोरवडे कार्याध्यक्ष सागर लादे संदीप थोरवडे  सतीश भिसे रोहन  लादे अभिजीत तिरमारे यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 







No comments:

Post a Comment