Wednesday, August 30, 2023

आई-वडिलांना जी मुलं सांभाळणार नाहित त्या मुलांना कोणताही शासकीय लाभ किंवा दाखले मिळणार नाहीत : मसुर ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक ठराव; राज्यभरातूंन ठरावाचे कौतुक ;


वेध माझा ऑनलाईन। आई-वडिलांना जी मुलं सांभाळणार नाहित त्या मुलांना कोणताही शासकीय लाभ किंवा दाखले न देण्याबाबतचा ठराव कराड तालुक्यातील मसूर ग्रामपंचायतीने नुकताच घेतला आहे. तसेच प्रत्येकाने नावामध्ये स्वतःचे नाव त्यानंतर आईचे, वडिलांचे व आडनाव असे क्रमशः लावायचे आहे अशा धोरणात्मक निर्णयाचा ऐतिहासिक ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंकज दीक्षित होते. दरम्यान असा ठराव घेणारी ही राज्यातील कदाचित पहिलीच ग्रामपंचायत असावी त्यामुळे या ठरावाचे राज्यभरातून विशेष कौतुक होताना दिसतंय
दरम्यान राज्यभरातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी हा ठराव करण्याची गरज असून भविष्यात याबाबतीत कायदा होण्याची देखील गरज असल्याचे सरपंच पंकज दीक्षित यांनी वेध-माझा शी बोलताना सांगितले...

माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नरेश माने, माजी उपसरपंच संजय शिरतोडे, सदस्य रमेश जाधव, सुनील जगदाळे,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे,संग्रामसिंह जगदाळे, प्रमोद चव्हाण जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, जागृत ग्राहक राजा संघटनेचे राज्य संघटक दिलीप पाटील, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, प्रा. कादर पिरजादे, ऍड. रणजितसिंह जगदाळे, वैद्यकीय अधिकारी मैथिली मिरजे, वीज वितरणचे नलवडे , जलयुक्तचे अभियंता आदिनाथ शिरसाठ, तसेच आशा वर्कर्स अंगणवाडी ,शिक्षण व आरोग्य विभाग ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment