वेध माझा ऑनलाईन। आज मोदी सरकारने जनतेला दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट दिले आहे. २ दिवसांपूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडर वर २०० रुपयांची आणि उज्वला योजनेअंतर्गत ४०० रुपयांची सबसिडी जाहीर केली होती. आता सरकार कडून कमर्शियल गॅसच्या किमतीत सुद्धा तब्बल १५७ रुपयांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
देशातील सरकारी तेल कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या किमती अपडेट केलया आहेत. यावेळी सरकार कडून गॅसच्या किमतीत १५७ रुपयांची कपात करण्यात आली. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सुद्धा 100 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे सलग २ महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्यामुळे हॉटेल चालकांसाठी मोठा दिलासा आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ऑगस्टमध्ये 1680 रुपये होते, आता तुम्हाला यासाठी 1522.50 रुपये मोजावे लागतील.
No comments:
Post a Comment