वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार सक्रीय झाले आहेत. स्वत: शरद पवार राज्यात दौरे करुन सभा घेत आहेत. या सभांमधून बंडखोरांवर निशाणा साधत आहेत. आता अजित पवारही मैदानात उतरले आहेत.पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार विरुद्ध अजित पवार सामना आता रंगणार आहे कारण शरद पवार यांना रोखण्यासाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत त्यासाठी त्यांनी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.
राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूंकप झाला. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली अन् ते शिवसेना-भाजपच्या गटात दाखल झाले. अजित पवार यांच्यासोबत नऊ जण शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर पक्ष सावरण्यासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरले. त्यांनी राज्याच्या विविध भागांत दौरे सुरु केले आहेत. राज्यातील प्रत्येक मतदार संघ पिंजून काढण्याचे काम शरद पवार करणार आहेत. शरद पवार आक्रमक झाले असताना आता अजित पवारही सक्रीय झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना रोखण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आली आहे. आपला गट मजबूत करण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार करणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत आगामी निवडणुकांमध्ये दिसणार आहे.
No comments:
Post a Comment