वेध माझा ऑनलाईन । जी.के. गुजर मेमोरीयल चॅरीटेबल ट्रस्टच्या डॉ. अशोक गुजर इन्स्टिट्यूटस ऑफ फार्मसी B Pharmacy महाविद्यालयाला सन 2023-24 पासुन फार्मसी कौन्सील ऑफ इंडियाने 60 जागेसाठी मान्यता दिली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक गुजर यांनी दिली.
बी फार्मसीची केंद्रीभुत प्रवेश प्रक्रीया सुरु असुन प्रवेश फेरीच्या प्रक्रीयेच्या तिस-या फेरीमध्ये महाविद्यालयाचे नाव दाखल झाले असुन परिसरातील फार्मसी करण्या-या विदयार्थ्यानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या सचीव डॉ. माधुरी गुजर यांनी केले. अदयावत प्रयोगशाळा उच्चविद्याविभूषित प्राचार्य, शिक्षक वर्ग, परिपुर्ण भौतिक सुविधासह वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. संस्थेने मागील 15 वर्षापासून दर्जेदार शिक्षणाची परंपरा ही दौलतराव आहेर अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या रुपाने जपली आहे.सातारा जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील हजारो विदयार्थी उच्च शिक्षण घेऊन नामंकीत कंपन्यात नोकरी करत आहेत.
नव्याने विकसीत होत असलेल्या बी फार्मसी चालु शैक्षणीक वर्षासाठी प्रवेश प्रक्रीया राबविली जाणार असुन सीईटी दिलेल्या विदयार्थांनी संर्पक साधण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष इंद्रजीत गुजर यांनी केले. (महाविद्यालयाचा कोड नं. 16112) असा आहे.
No comments:
Post a Comment