Saturday, August 19, 2023

कराडच्या लिबर्टी मंडळाला 10 लाखाचा निधी मिळणार ; आ पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली ग्वाही ;

वेध माझा ऑनलाईन ।  कराडच्या लिबर्टी मजदूर मंडळाच्या संचालक पदाधिकार्यानी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन अत्याधुनिक व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी निधी मिळावा अशी निवेदनाद्वारे आज मागणी केली असता आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य क्रीडा आयुक्तांशी तात्काळ दूरध्वनीद्वारे चर्चा करत 10 लाखाचा निधी देण्याची लिबर्टी मंडळाला  ग्वाही दिली.

यावेळी लिबर्टीचे अरुणराव जाधव, रणजीत नाना पाटील, मुनीर बागवान सावकार, रमेश जाधव, विजय गरुड, किशोर शिंदे, ऍड. मानसिंगराव पाटील, काशिनाथ चौगुले आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment