Tuesday, August 22, 2023

ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणातील मोठे मासे निसटण्याची शक्यता !

वेध माझा ऑनलाईन। ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणात व्हायरल व्हिडीओत काही राजकीय नेत्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. मात्र, व्हिडीओ व एफआरआयमधील गुन्हेगारांना अटक करण्याऐवजी चिठ्ठीत नमूद केलेल्या नावांवरून आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पीए सह अन्य चार जणांना अटक करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यामुळे ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणातील मोठे मासे निसटण्याची शक्यता आहे.

ननावरे दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी काढलेल्या व्हिडीओत फक्त चौघांची नावे घेतली होती. तर, मिळालेल्या चिठ्ठीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे स्वीय सहायक शशिकांत साठे यांच्यासह माजी आमदार पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी गणपती कांबळे यांची नावे असल्याने त्यांना खंडणीविरोधी पथकाने अटक करून चौकशी सुरू केली आहे. ननावरे यांचे अनेक आमदारांसोबत चांगले संबंध होते. मात्र, त्यांना कोणत्या कारणावरून अनेकांनी त्रास दिला. ज्यामुळे ननावरे दाम्पत्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. याचे कोडे पोलिसांसह नागरिकांना पडले आहे.

No comments:

Post a Comment