Wednesday, August 16, 2023

अखिल मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्याच्या वतीने कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन ; राज्यभरात विविध पत्रकार संघटनांच्या वतीने आंदोलन ; पत्रकारांवर हल्‍ले होणे ही बाब निषेधार्ह ;

वेध माझा ऑनलाइन । पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍या निषेधार्थ राज्यातील बहुतांशी पत्रकार संघटनानी आज ठिकठिकाणी याबाबतचा निषेध नोंदवत आंदोलने केली सातारा जिल्हा अखिल मराठी पत्रकार संघाच्या वतीने देखील आज दुपारी १२ वाजता कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे याना याबाबत निषेध व्यक्त करणारे निवेदन देण्यात आले 

यावेळी अखिल मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य गोवेकर कार्याध्यक्ष दिनकर थोरात सचिव अतुल होनकळसे तसेच  खंडू इंगळे संतोष शिंदे सौ प्रगती पिसाळ उपाध्यक्ष हरून मुलाणी सुहास पाटील विकास साळुंखे कैलास थोरवडे इलाही मुल्ला प्रकाश पिसाळ संतोष गुरव संकलेन मुलाणी अस्लम मुल्ला आदी पत्रकार उपस्थित होते 

पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी  शिव्या देत त्यांच्यावर भ्याड हल्ला केला होता  या घटनेचा निषेध संपूर्ण राज्यभर केला जात आहे पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यात अंमलबजावणी का होत नाही ? हा कायदा कुचकामी का ठरत आहे.? असा सवाल यानिमित्ताने निवेदनातून करण्यात आला आहे असे भ्याड हल्ले पत्रकारांवर होणे ही बाब निषेधार्ह असल्याचे मत उपस्थित पत्रकारांनी यावेळी व्यक्त केले पत्रकार कायद्याची अंमलबजावणी होऊन दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली दरम्यान आज विविध पत्रकार संघटनांच्यावतीने संपुर्ण राज्यात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे

No comments:

Post a Comment