वेध माझा ऑनलाईन। अजित पवार काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ‘शरद पवार व अजित पवार हे आतून एकच आहेत’. पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर शरद पवार यांनी थेट उत्तर दिले आहे. आमच्यात कसलीही एकजूट नाही. आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार गटाला जनता जागा दाखवून देईल, असे स्पष्टपणे शरद पवार यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, जलसंपदा घोटाळा व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याची चौकशीही नरेंद्र मोदी सरकारने करावी, असे थेट आव्हान सुद्धा शरद पवार यांनी यावेळी दिले. शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव घेतले नाही. परंतु जलसंपदा व शिखर बँकेचा उल्लेख करून त्यांनी थेट अजित पवारांवरच तोफ डागली.
विरोधी पक्षांची एकजूट असलेल्या ‘इंडिया’ची बैठक ग्रँट हयात हॉटेलमध्ये सुरू होणार आहे. या संभाव्य बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासह विविध नेते उपस्थित होते. इंडियातील घटक पक्ष एकत्र येवून पुढील निवडणुका लढवणार आहोत. पहिल्या दोन बैठका एकत्र येण्याच्या दृष्टीने महत्वाच्या होत्या. निवडणुका कशा लढायच्या, जागा वाटप कसे करायचे याबाबत मुंबईतील या बैठकीत चर्चा होऊ शकते, असेही शरद पवार म्हणाले.
No comments:
Post a Comment