वेध माझा ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांनी सातारा लोकसभा मतदार संघांचा बैठकीतून आढावा घेतला. यावेळी "साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांना बळ द्या," असा कानमंत्र देत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना ठाकरेंनी आदेश दिले.
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी, भाजप पाठोपाठ आता उद्धव ठाकरे गट शिवसेनेनेही अंतर्गत बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी दोन टप्प्यात राज्यातील लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी बैठकी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबईत आज त्यांच्या मातोश्री येथील निवासस्थानी दुपारी तीन वाजता सातारा जिल्हा लोकसभा मतदार संघ व कराड,पाटण विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक पार पडली. या बैंठकीस सातारा जिल्हा प्रमुख हर्षद कदम, शिवसेनेचे उपनेते तथा प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्यासह जिल्हयातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रथम सातारा लोकसभा मतदार संघात त्यांच्या गटाची असलेली ताकद, कार्यकर्त्ये व पक्षातील कार्यकर्त्याचीही असलेली संख्या आदींसह अनेक विषयावर चर्चा केली. तसेच सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांना बळ देण्याचा कानमंत्रही पदाधिकाऱ्यांना दिला. त्यानंतर त्यांनी कराड व प्रामुख्याने पाटण विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. या मतदार संघाबाबतही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
No comments:
Post a Comment