वेध माझा ऑनलाईन । कराड उत्तरच्या मसूर विभागातल्या 19 गावांच्या शेतकऱ्यांनी हणबरवाडी ,शहापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळण्यासाठी मसूरला चौकात केलेला रस्ता रोको अखेर 22 ऑगस्टला पाणी सोडण्याच्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आला.
आमदार पाटील व जलसंपदा अधिकारी यांच्यात पाणी सोडण्यासंदर्भात धुमसचक्री उडाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. पाणी सोडण्यासंदर्भात अधिकारी ठाम आश्वासन देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी चौकात रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आमदार श्री. पाटील यांच्यासह मानसिंगराव जगदाळे, अजितराव पाटील- चिखलीकर, प्रशांत यादव, संगीता साळुंखे, तानाजी साळुंखे, लहुराज जाधव, माणिकराव पाटील, डॉ. विजय साळुंखे, लालासाहेब पाटील व भागातल्या 19 गावांच्या शेतकऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनी हक्काच्या पाण्यासाठी चौकात ठाण मांडले.
दरम्यान अधिकारी पाणी सोडण्यासंदर्भात निर्णय देत नव्हते. निर्णयाशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा ठाम निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. त्यानंतर थेट पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी संपर्क साधला. मंत्री देसाई व आमदार पाटील यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी 22 ऑगस्टला पाणी सोडण्यासंदर्भात ठाम आश्वासन आमदार पाटील यांना दिले. आश्वासनानंत हा रस्ता रोको मागे घेण्यात आला.
दरम्यान आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले 22 ऑगस्टला पाणी सोडणार या पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला आहे. पाणी सोडले नाही तर 23 ऑगस्टला उग्र आंदोलन करण्यात येईल.
No comments:
Post a Comment