वेध माझा ऑनलाईन। अजित पवार आमचे नेते असं मी म्हटलं नाही असे म्हणत आता शरद पवारांनी आपल्या सकाळच्या वक्तव्यावर घुमजाव केले आहे दहिवडी येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
बारामती येथे पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अजित पवार आमचेच नेते असून आमच्या पक्षात फूट नाही असं म्हटलं होतं. या प्रश्नावरून आता शरद पवार यांनी आपले उत्तर देत आमची भूमिका वेगळी असल्याचे म्हटले आहे. तसेच एखाद्या व्यक्तीला एकदा संधी द्यायची असते. वारंवार संधी द्यायची नसते. तसेच त्यांनीही पुन्हा संधी मागायचे नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे आता अजित पवारांना पुन्हा संधी दिली जाणार नाही आणि त्यांनीही संधी मागू नये, असे म्हटले आहे तर दुसरीकडे अजित पवार आमचे नेते आहेत अस मी म्हटलच नाही अस म्हणत त्यांनी घुमजाव देखील केले आहे
No comments:
Post a Comment