वेध माझा ऑनलाईन। पत्रकारांवर होणारे हल्ले आणि सरकारच्या बघ्याच्या भूमिकेची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने स्वत:हून दखल घेतली असून पाचोरा पत्रकार हल्ला प्रकरणी पीसीआयने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे या प्रकरणी प्रेस कौन्सिलने राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे प्रेस कौन्सिलने एक सत्य शोधन समिती देखील स्थापन केली आहे ही समिती पाचोऱ्याला जाऊन सर्व वस्तुस्थितीची माहिती करून घेईल अशी माहिती मिळत आहे सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येत केलेल्या आंदोलनाचा हा विजय असल्याचे मानले जात आहे
10 ऑगस्ट रोजी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या गुंडांनी हल्ला केला होता त्यानंतर मुंबईतील तेरा वेगवेगळ्या पत्रकार संघटनांनी एकत्र येत राज्यपालांची भेट घेऊन त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती 17 ऑगस्ट रोजी याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या पत्रकार संघटनांनी निदर्शनं करीत या घटनेचा निषेध नोंदवला होता महाराष्ट्रातील या सर्व घडामोडींची, प्रेस कौन्सिलने स्वतःहून दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस पाठविली आहे..राज्य सरकारला ही मोठी चपराक असल्याचे मानले जात आहे
No comments:
Post a Comment