Thursday, August 31, 2023

पूर्वीप्रमाणे सहकार्य करा ; शेखर चरेगावकर यांचे लोकांना आवाहन ;

वेध माझा ऑनलाईन। बँकेचे थकबाकीदार कर्जदार संजीव कुलकर्णी, विनोद कदम, उध्दव पासलकर व संदिप घळसासी यांनी त्यांचे यशवंत बँकेकडील थकीत कर्जाचे कारवाईबद्दल सुडबुध्दीने माझ्यावरती काही आरोप केलेले आहेत. वास्तवीक पाहता माझा वाई अर्बन बँकेच्या व्यवहाराचा आणि यशवंत बँकेचा काहीही संबंध नाही. शिवाय वाई अर्बन बँकेमधील कर्ज प्रकरणामध्ये असलेल्या तारण मालमत्ता अद्यापपर्यंत आम्हांला ताब्यात मिळालेली नाही. या विषयाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, याबाबतची अपुरी माहीती लोकांपुढे मांडून माझी व पर्यायाने यशवंत बँकेची बदनामी या थकबाकीदार कर्जदारांनी केलेली असून अजुनही करत आहेत. तरी चुकीच्या बातम्यांना बळी पडणाऱ्या ठेवीदारांना आपण मागताक्षणीच पैसे देत आहोत, ही देखील जमेची बाब आहे  सर्व तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीमध्ये यशवंत बँकेचा उल्लेख केलेने बँक त्यांचे विरुध्द आब्रुनुकसानीचा दावा देखील दाखल करणार आल्याची माहिती दि यशवंत को- आॅप बॅंकचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.दरम्यान माझ्या अध्यक्ष पदाबाबत असलेल्या प्रोपोगंडा बाबत मी न्यायालयामध्ये दाद मागीतलेली आहे तरी यशवंत बॅंकेचे कामकाज आपण अधिक जोमाने करणार असून लोकांनी पूर्वीप्रमाणे सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, या सर्व थकबाकीदारांवर कठोर कायदेशीर कारवाई केल्याने यामधील काही जणांच्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत. तर काही लिलावामध्ये काढलेल्या आहेत. यामधील तक्रारदार विनोद कदम यांना अजामीनपात्र वॉरंट निघालेले आहे. हे तकारदार बँकेच्या हितासाठी तक्रारी केलेल्या आहेत, असे म्हणत आहेत. जे मुलतः स्वतः थकबाकीदार आहेत. तसेच ते पैसे भरत नाहीत ते तक्रारदार आपल्या बँकेचे हित कसे काय जोपासणार? याबाबत विचार करणे आवश्यक आहे.

माझ्या अध्यक्ष पदाबाबत असलेल्या प्रोपोगंडा बाबत मी न्यायालयामध्ये दाद मागीतलेली आहे. तरीदेखील अशा चुकीच्या बातम्यांना बळी पडणाऱ्या ठेवीदारांना आपण मागताक्षणीच पैसे देत आहोत, ही देखील जमेची बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यावी ही विनंती. आजपर्यंत आपले सहकार्य व विश्वासावर बँकेची यशस्वी वाटचाल आपण करु शकलो आहोत. यापुढे देखील आपल्या विश्वासाने, सहकार्याने अधिक चांगल्या पध्दतीने, अधिक जोमाने कामकाज करु असा विश्वास आहे. आपले सर्वांचे पुर्वीप्रमाणे सहकार्य लाभावे.


No comments:

Post a Comment