वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आज कराड शहरात मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चीब, सहप्रभारी एहसान खान, प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रवक्ते मा. दीपक राठोड, महासचिव श्रीनिवास नालमवार, प्रदेश सरचिटणीस तारिक बागवान, सातारा जिल्हा प्रभारी अनिकेत नवले, सातारा जिल्हाध्यक्ष अमरजीत कांबळे, कार्याध्यक्ष अमित जाधव, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अजित केंजळे, कराड उत्तर काँग्रेस कमिटी अध्यक्ष निवास थोरात,राज्याचे अल्पसंख्याक उपाध्यक्ष झाकीर पठाण कोयना बँकेचे उपाध्यक्ष विजय मुठेकर कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, देवदास माने, गणेश उबाळे, राजेंद्र यादव, श्रीकांत मुळे, अभिजित चव्हाण, दिग्विजय सूर्यवंशी, मुबीन बागवान आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. वाढलेली बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, सरकारी नोकर भरती व स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, महिलांवरील अत्याचार, विरोधात हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले
No comments:
Post a Comment