वेध माझा ऑनलाइन। टिटॅनियम, मॅगनिस, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याची माहिती देण्यात आली आहे. दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे आढळून आले आहे. दक्षिण ध्रुवावर हायड्रोजनचा शोध रोव्हरकडून सुरू असल्याची माहिती इस्त्रोने दिली आहे.
विक्रम लँडरमधून वेगळे झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने आपल्या कामास सुरुवात केली आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण सुरू केले. इस्रोने मातीच्या तापमानाचा आलेखही शेअर केला आहे. आलेखामध्ये तापमान उणे 10 अंश सेल्सिअस ते 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले.
चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारता हा पहिलाच देश आहे.
भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. शनिवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
No comments:
Post a Comment