Thursday, August 24, 2023

काँग्रेस- राष्ट्रवादीला धक्का ; कापील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच अपात्र

वेध माझा ऑनलाइन। कराड तालुक्यातील कापील येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कल्पना तानाजी गायकवाड यांना अपात्र केल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ ‌राव यांनी दिली आहे 

तक्रारदार यांनी विद्यमान सरपंच ग्रामपंचायतीमध्ये पदाचा गैरवापर केल्याने कारवाईची मागणी केली होती त्यामुळे नळपाणी योजनेतील गैरव्यवहाराची चाैकशी करण्याची मागणी केली होती. सरपंचांनी 67 पाणी मीटर ग्रामपंचायतीच्या मान्यतेशिवाय पुरवठा दाराकडून स्वतः कडे ताब्यात घेतल्याचे दिसून आले असून जिल्हा परिषद सातारा यांनी दिलेल्या अहवालावरून सरपंच यांनी अधिकारांचे उल्लघंन केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यावरून उर्वरित कालावधीसाठी कापील गावच्या सरपंच कल्पना गायकवाड यांना पदावरून हटविण्यात येत असल्याचे विभागीय आयुक्त साैरभ राव यांनी म्हटले आहे या ग्रामपंचयात निवडणुकीत भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांच्या पॅनेलच्या विरोधात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढलेली होती. यामध्ये भाजपचे 5 तर काॅंग्रेस व राष्ट्रवादीचे 6 सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच असे 7 जण निवडूण आले होते. आजच्या सरंपच अपात्रतेच्या निकालामुळे काॅंग्रेस व राष्ट्रवादीला धक्का बसला आहे !

No comments:

Post a Comment