वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादीतील ज्या नऊ आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली, आणि ज्या दोन खासदारांनी त्यांना साथ दिली त्यांच्यावर आता कारवाई करावी अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून विधिमंडळाचे अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापतींना देण्यात आलं आहे.
अनुसूची 10 प्रमाणे नऊ आमदार आणि दोन खासदारांवरती अपात्रतेची कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. पण त्यांना दिलेल्या नोटिसीला अद्याप उत्तर दिलेलं नाही.
पक्षाच्या वतीने अजित पवार गटाने शरद पवार गटाला एक नोटिस पाठवली होती. त्यावर अद्याप शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलं नाही. पण यासाठी किती कालावधी लागू शकतो याची कल्पना नाही, त्यामुळे या आमदारांवर कारवाई सुरू करा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment