वेध माझा ऑनलाईन। आज सकाळी सुपने गावाजवळ अनेक विद्यार्थी एकत्र येत कराड- पाटण रस्त्यावर एसटी बसेस रोखल्या. कराड आगार व्यवस्थापनाला निवेदन देवून व अधिकाऱ्यांनी आश्वासन देवूनही एसटी बस सुरू न झाल्याने हा रास्तारोको करण्यात आला.
आज शुक्रवारी सकाळी 6.30 वाजल्यापासून काॅलेजच्या विद्यार्थ्यांना एसटी बस थांबत नसल्याने 7 वाजल्यापासून या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसेस थांबवल्या. यावेळी विद्यार्थी- विद्यार्थींनी यांच्यासह ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित जाधव, विनोद पाटील, पोलिस पाटील कमलेश कोळी, हिंदू एकता आंदोलनचे तुषार उर्फ गणेश पाटील यांनी विद्यार्थ्याच्या तीव्र भावना मांडल्या. यावेळी उपस्थितांनी एसटी आगाराचे वैभव साळुंखे यांच्याशी चर्चा करून रास्तारोको आंदोल तात्पुरते मागे घेण्यात आले
No comments:
Post a Comment