वेध माझा ऑनलाईन । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीए सोबत यावं यासाठी अजित पवार वारंवार भेटीगाठी घेऊन सोबत येण्याबाबत विनंती करत असतानाच दुसरीकडे शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केंद्रीय यंत्रणांच्या धाडी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून नुकताच जळगावच्या ईश्वर लाल जैन यांच्या कंपन्यांवर ईडीच्या धाडी पडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांचे निकटवर्तीय ईडीच्या रडावर आल्याचा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन जुलैला फूट पडली आणि त्यानंतर पहिल्यांदाच ईडी कडून शरद पवारांना अप्रत्यक्षरीत्या टार्गेट करण्यात येत असल्याचं समोर आला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे पंधरा वर्षे खजिनदार राहिलेल्या जळगावचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सचा मुंबई नाशिकसह सहा कंपन्यांवर इडी आणि आयकर विभागाने छापे मारले आहेत. यावेळी माजी आमदार मनीष जयंती यांचे देखील अधिकाऱ्यांना कसून चौकशी केली आहे.
दिवसेंदिवस शरद पवार यांचे विरोधकांकडून तयार करण्यात आलेल्या आघाडीत महत्त्व वाढताना पाहिला मिळत आहे. अशावेळी शरद पवार यांना एनडीए सोबत घेऊन विरोधकांची आघाडी खिळखिळी करण्याचा प्रयत्न केंद्रीय स्तरावर होत आहे. याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांना देखील सोबत घेण्यात आल आहे. मात्र तरी देखील शरद पवार सोबत येत नसल्यामुळे ईडीचा ससेमिरा पुन्हा एकदा सुरू झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे
No comments:
Post a Comment