Tuesday, March 29, 2022

गडकरींची विधेयकास मंजुरी ; ऑक्टोंबर पासून सर्वच कारमध्ये 6 एअर बॅग्स कम्पलसरी...

वेध माझा ऑनलाइन - देशातील सर्वच नवीन कारमध्ये 1 ऑक्टोबर 2022 पासून 6 एअरबॅग असणे अनिवार्य असल्याचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. रस्ते व राजमार्ग मंत्रालयाने जानेवारी महिन्यात एक विधेयकास मंजुरी दिली होती. त्यानुसार, 8 प्रवाशांची वाहतूक क्षमता असलेली आणि 3.5 टन पेक्षा कमी वजन असणाऱ्या सर्वच कारमध्ये 6 एअर बॅग अनिवार्य असणार आहेत. त्यामुळे, 1 ऑक्टोबरपासून सर्वच वाहनात ड्युअर फ्रंट एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. 

कारमध्ये वाढीव एअरबॅग अनिवार्य केल्यामुळे कारच्या किंमतीवरही त्याचा परिणाम होणार आहे. ऑटो एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार या नियमामुळे कारच्या किंमती 50 हजार रुपयांनी वाढू शकतात. सध्याच्या कार मॉडेलमध्ये साईड आणि कर्टेन एअरबॅगची कमतरता जाणवते. त्यामुळे, बॉडी पॅनेल आणि इंटेरियर ट्रीममध्येही काही बदल होऊ शकतात. ज्यामुळे गाडीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, सध्या गाड्यांमध्ये मीड-व्हेरिएंट आणि टॉप वेरिएंट मध्ये 6 एअरबॅग देण्यात येत आहेत. 

No comments:

Post a Comment