Thursday, March 31, 2022

राष्ट्रीय महामार्गावरील टोल करात 10 ते 65 रुपयांची वाढ ; आज रात्री 12 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार !

वेध माझा ऑनलाइन - पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमध्ये  आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून राष्ट्रीय महामार्गावरील  प्रवास महागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गावरील टोल करात 10 ते 65 रुपयांची वाढ केली आहे. तर छोट्या वाहनांसाठी 10 ते 15 रुपयांनी वाढ, तर व्यावसायिक वाहनांसाठी 65 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

उद्या 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करण्यासाठी लोकांना जास्त पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि दिल्लीला जोडणाऱ्या बहुतांश महामार्गांवरील टोल टॅक्समध्ये किमान 10 टक्के वाढ झाली आहे. किमती वाढल्यानंतर आता कार मालकांना किमान 5 रुपये अधिक कर भरावा लागू शकतो. माहितीनुसार, उत्तर प्रदेश-हरियाणामध्ये येणाऱ्या कुंडली-मानेसर-पलवल महामार्गावर आता कारकडून 1.46 रुपयांऐवजी 1.61 रुपये प्रति किलोमीटर टोल लोकांकडून आकारला जाणार आहे.

No comments:

Post a Comment