Tuesday, March 29, 2022

शरद पवारांनी आयुष्यभर आग लावण्याचे काम केले ; त्यांचे पवार आडनाव बदलून 'आगलावे' करावे; शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जहरी टीका ...

वेध माझा ऑनलाइन - शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. जाईल तिथं आग लावायची एवढेच त्यांचे राज्यात काम आहे. त्यांचे आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांचे पवार हे आडनाव बदलून 'आगलावे' असे करावे अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साेलापूरात केली. 

सदाभाऊ खोत हे साेलापूर दाै-यावर आज (साेमवार) आले आहेत. साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करीत महाविकास आघाडी सरकारचा कारभार शेतक-यांच्या मुळावर आल्याचे म्हटलं.

दरम्यान सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना सदभाऊंनी पवारांवर तोफ डागली. ते म्हणाले जाईल तिथे पवार साहेब काड्या लावण्याचे काम करीत असतात. खरं तर ते महान नेते आहेत. मात्र एकीकडे आग लावल्यानंतर पुन्हा दुसऱ्याच्या (ठिकाणी) घराला आग लावायला निघून जायचं. त्यांचे आयुष्यच आग लावण्यामध्येच गेलं. त्यामुळे पवार हे आडनाव बदलून 'आगलावे' असे करावं.

No comments:

Post a Comment