Saturday, March 26, 2022

प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ ,; न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला...मुंबै बँक निवडणुक प्रकरण...

वेध माझा ऑनलाइन - प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक  निवडणुकीसाठी मजूर संस्थेअंतर्गत अर्ज दाखल केला होता. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दरेकर यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, आता मुंबई सत्र न्यायालयाने प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

प्रथमदर्शनी पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याचे दिसून आले आहे असं न्यायालयाने म्हटलं असून त्याच्या आधारेच प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. प्रविण दरेकर यांचा जामिन अर्ज फेटाळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी 2017 मध्ये मजूर म्हणून संस्थेकडून मोबदला स्वीकारला आहे आणि त्यावेळेस ते नागपूरला होते अशी माहिती समोर आली आहे.
हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रवीण दरेकर यांच्या वकीलांनी न्यायालयात अर्ज केला आहे की, आम्हाला मुंबई उच्च न्यायालयात अपील करायचं आहे आणि जोपर्यंत आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आम्ही अर्ज करत नाही तोपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment