वेध माझा ऑनलाइन - रशिया आणि यूक्रेनच्या युद्धात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची सीक्रेट गर्लफ्रेन्ड अलीना कबाइवा 'अडकली' आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, पुतिन यांची गर्लफ्रेन्ड स्वित्झर्लॅंडमध्ये एका सुरक्षित ठिकाणी आहे. अशात अलीनाला देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, काही कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे, ज्यात पुतिन यांच्या गर्लफ्रेन्ड देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे.
अलीना ही पुतिन यांच्या तीन मुलांची आई असल्याचं म्हटलं जातं. एक खेळाडू म्हणून अलीनाने अनेक खिताब आणि मेडल मिळवले. पुतिन यांच्यासोबत नाव जोडलं गेल्यानंतर तिचं जीवन पूर्णपणे बदललं. आता ती रशिया-यूक्रेनच्या युद्धात 'अडकली' आहे. स्वित्झर्लॅंडमधील लोकांची इच्छा आहे की, तिला इथे ठेवू नये. कारण तिचं नातं यूक्रेनला युद्धात ढकलणाऱ्या पुतिनसोबत आहे.
अलीना शेवटची २०१८ मध्ये दिसली होती. तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती होती. ब्लादिमीर पुतिन यांचं पर्सनल आयुष्य अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. अशात अलीनाबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. पण असं मानलं जात आहे की, रशियावर चहूबाजूने लागत असलेल्या प्रतिबंधांमुलळे पुतिन यांनी आपल्या परिवाराला स्वित्झर्लॅंडला पाठवलं आहे. अलीना एक यशस्वी जिम्नास्ट होती. तिने ऑलम्पिकमध्ये दोनदा गोल्ड मेडल, १४ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २५ यूरोपिय चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला आहे. स्पोर्ट्समधून रिटायर झाल्यानंतर ती राजकारणात गेली आणि पुतिन यांच्या पक्षाची खासदारही झाली होती.
अलीना आणि पुतिन यांचं नाव पहिल्यांदा २००८ मध्ये जोडलं गेलं होतं. पुतिन यांच्याआधी २००४ मध्ये डेविड मुसेलिआनीसोबत अलीनाच्या अफेअरची चर्चा रंगली होती. एका रशियन वृत्तपत्राने पहिल्यांदा दावा केला होता की, पुतिन आणि अलीना यांच्या प्रेम प्रकरण सुरू आहे. पण त्यानंतर या बातम्या खोट्या असल्याचं सांगण्यात आलं होतं. नंतर हा पेपर बंद पडला. २०१९ मध्ये समोर आलं की, अलीनाने मॉस्कोच्या एका हॉस्पिटलमध्ये जुळ्या बाळांना जन्म दिला. यावेळी हॉस्पिटलचा व्हिआयपी फ्लोर रिकामा करण्यात आला होता. पण नंतर या बातमीचंही खंडन करण्यात आलं होतं.
No comments:
Post a Comment