वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या 81 व्या वर्षी सुद्धा राज्यभरात पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे दौरे करत असतात. अगदी ठरल्यावेळी शरद पवार बिनचूक दौरा करत असतात. आज मुंबई विमानतळावर शरद पवारांचा साधेपणा पाहण्यास मिळाला. व्हीआयपी रांग सोडून त्यांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत विमानात प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीच्या दौऱ्यावर निघाले होते. दिल्लीला जाण्यासाठी ते मुंबई विमानतळावर पोहोचले होते. नेहमी व्हीआयपी व्यक्तींना विमान प्रवासात वेगळ्या रांगेतून प्रवेश दिला जात असतो. मागील जागेवरील सर्व प्रवाशी आत गेल्यानंतर व्हीआयपी व्यक्तींना प्रवेश दिला जातो.
पण, शरद पवार यांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत विमानात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी रांगेत उभं राहून विमानात प्रवेश केला. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष आपल्यासोबत रांगेत उभे असलेल्याचे पाहून प्रवाशीही अवाक् झाले होते.
No comments:
Post a Comment