Wednesday, March 23, 2022

मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व निर्बंध हटवले जाणार ; केंद्र सरकारकडून करण्यात आली घोषणा...

वेध माझा ऑनलाइन - देशभरात कोरोनाची लाट आता ओसरत चालली आहे. ठीक दोन वर्षांपूर्वीच आजच्या दिवशी देशभरात लॉकडाऊन सुरू झाला होता आणि अनेक निर्बंध लावण्यात आले होते. पण, आता कोरोनाची लाट ओसल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व निर्बंध हटवले जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. फक्त मास्क आणि सहा फूट अंतर राखण्याची नियम लागू राहणार आहे.

केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने महामारी रोखण्यासाठी लादलेले सर्व निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्चपासून कोरोना निर्बंध संपणार आहेत. दोन वर्षांनंतर देशातील जनतेची या निर्बंधातून सुटका झाली. आता फक्त सहा फुटाचे अंतर राखावे लागणार असून मास्क लावावा लागणार आहे.

दरम्यान, डेल्टाक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराने भारतात दार ठोठावले असून महाराष्ट्र-दिल्लीसह 7 राज्यांमध्ये 568 प्रकरणांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, नोव्हावॅक्स कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. नोव्हॉवॅक्सने भारतात 12-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता जाहीर केली आहे.



No comments:

Post a Comment