वेध माझा ऑनलाइन - त्यांच्याकडून जी वागणूक येतंय. त्यामुळे मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. मुळात आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे? असा सवाल उपस्थितीत करत शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहे. आज कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांनी कोकण विकासाच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.
' त्यांच्याकडून जी वागणूक दिली जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कुटुंबावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. देशासमोरील विषय हे राजकारणापेक्षा महत्वाचे आहेत. आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे? असं म्हणत पुढील काळात भाजपशी मैत्रीचा विषय आदित्य ठाकरेंनी संपवला.
'राजकीय षडयंत्र सुरू आह, बिगर भाजप राज्यात सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकला जात आहे. पण टक्कर द्यायला आम्ही सज्ज आहोत घाणेरडं राजकारण थांबला पाहिजे. हातात राज्याची सत्ता नसल्यामुळे नैराश्यातून हे सुरू आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांचं नाव न घेता लगावला.
'दोन पक्ष जिथं एकमेकांविरोधात लढलोय तिथं नाराजी असणं स्वाभाविक आहे. वरिष्ठ नेते लक्ष घालत आहे, तानाजी सावंत यांचे वैयक्तिक मत होते. भेदभाव न करता पुढे जावं लागेल. नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं म्हणत तानाजी सावंत यांच्या विधानावर आदित्य ठाकेरेंनी बोलण्याचं टाळलं.
No comments:
Post a Comment