Thursday, March 17, 2022

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात घट. देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही मोठी घट...

वेध माझा ऑनलाइन - देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात घट झाली आहे. देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2 हजार 539 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) 2 हजार 876 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.  तर 98 रुग्णांचा मृत्यू झाला होता. नोंद करण्यात आली आहे. तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 30 हजार 799 वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 कोटी 24 लाख 54 हजार 546 वर पोहोचली आहे.

No comments:

Post a Comment