Wednesday, March 30, 2022

सांगली शिवसेना जिल्हा प्रमुखांचा स्टेजवरच कापला खिसा... चोरटा कॅमेरात कैद...

वेध माझा ऑनलाइन - सांगली शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशामधून ५० हजार रुपयांच्या नोटांचे बंडल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओबीसी मेळाव्याच्या दरम्यान भर व्यासपीठावर ही घटना घडली आहे. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये नुकताच ओबीसी मेळावा पार पडला आहे. यावेळी वडेट्टीवार स्टेजवर उपस्थित असतानाच हा प्रकार घडला आहे. चोरट्याने सेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशात नोटा लांबवतानाची घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरु आहे. सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील ५० हजार रुपयांच्या नोटांचे बंडल चोरट्याने चोरले आहे. सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आले आहे.स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचे बंडल लांबवण्याची हिंमत केली आहे. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या आहेत. पैसे चोरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी याविषयी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment