Tuesday, March 29, 2022

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात ; आदित्य ठाकरे सुरक्षित; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक ब्रेक लावल्यामुळे दोन गाडीची टक्कर झाली अन् किरकोळ अपघात झाला. यामध्ये गाडीचं नुकसान झाले आहे. कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाही. 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. बुधवारी आदित्य ठाकरे मालवण येथील रॅलीला संबोधित करणार आहेत. येथून आदित्य ठाकरे यांनी आपला तीन दिवसाचा कोकण दौरा सुरु केला आहे. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याने शिवसेना कोकणातील आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवसेनेची कोकणात आधीच मोठी ताकद आहे. ही ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. कोकण शिवसेनाचा गढ मानला जातो. यावर राष्ट्रवादी आणि भाजपचा डोळा आहे.
दरम्यान या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आलीआहे. मात्र या अपघातामध्ये आदित्य ठाकरे सुरक्षित आहेत.

No comments:

Post a Comment