कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक सभागृह आणि शिवाजी हायस्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धांचे उद्घाटन कृष्णा स्कूलच्या प्राचार्या स्नेहल निकुंब यांच्या हस्ते आणि मुख्य संयोजक सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष सुधाकर चव्हाण, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. बी. साळुंखे, सचिन पवार, स्पर्धा समन्वयक अशोक सोमदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध वयोगटात घेण्यात आलेल्या या स्पर्धांपैकी रांगोळी आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर करुन, विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या बक्षिस वितरण कार्यक्रमात मलकापूरचे माजी नगरसेवक वसंतराव शिंदे, सुधाकर चव्हाण, बी. बी. साळुंखे, स्नेहल निकुंब, सतीश चव्हाण यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment