वेध माझा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आज कर्नाटक उच्च न्यायालयानं मोठा निर्णय सुनावला. शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब बंदी योग्यच असल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयानं दिला. तसेच, यावेळी हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याचंही कोर्टाने सांगितलं. दरम्यान यानंतर विविध स्तरातून यावर अनेक प्रतिक्रिया येत असून माजी खासदार हुसेन दलवाई यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ''श्रीमंत मुस्लिमांच्या मुली परदेशात शिकतात तेव्हा त्या हिजाब घालतात का? असा सवाल विचारत या वादामुळे मुस्लिम मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत'', असंही दलवाई म्हणाले आहेत.
कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरनंतर आपली प्रतिक्रिया देताना दलवाई म्हणाले, ''एका शाळेत सुरु झालेला वाद सगळ्या देशभरात कोण घेऊन गेलं? जरा उचकवलं की या मुद्द्यावर राजकारण करू पाहणाऱ्यांना हवं ते मिळतं हे मुस्लिमांनी लक्षात घ्यायला हवं. या अशाप्रकारच्या वादामुळे मुस्लिम मुली शिक्षणापासून वंचित राहता कामा नयेत.''
No comments:
Post a Comment