Tuesday, March 29, 2022

सर्वाधिक बँक घोटाळे महाराष्ट्रात...आरबीआयच्या आकडेवारीचा हवाला...

वेध माझा ऑनलाइन - सर्वसामान्यांचा एखादा हप्ता थकला तरी त्यांनी चिंता लागते की बँकेचे लोक घरी तर येणार नाही. बँकही त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करते. मात्र दुसरीकडे गेल्या 7 वर्षात बँक घोटाळे किंवा फसवणुकीतून देशाचे दररोज 100 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. मात्र, एकूण नुकसानीचे प्रमाणही वर्षानुवर्षे कमी होत आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने आरबीआयच्या आकडेवारीचा हवाला देत ही माहिती दिली आहे.

सर्वाधिक बँक घोटाळे किंवा फसवणूक महाराष्ट्रात घडली आहे, जिथे देशाची आर्थिक राजधानी मुंबई देखील आहे. बँक घोटाळा किंवा फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी सुमारे 50 टक्के घोटाळे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो.
या 5 राज्यांमध्ये गेल्या सात वर्षांत सुमारे 2 लाख कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे, जी एकूण रकमेच्या सुमारे 83 टक्के आहे. अहवालानुसार, 1 एप्रिल 2015 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत देशभरात सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांची बँकिंग फसवणूक आढळून आली आहे. या अहवालानुसार, फसवणूक प्रकरणांचा तत्पर अहवाल आणि प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वर्षानुवर्षे घट झाल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

No comments:

Post a Comment