वेध माझा ऑनलाइन - गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देभरभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा बंद होत्या. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं. मागील काही महिन्यापासून हे निर्बंध शिथिल करून हळूहळू शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र आता संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा 100 टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं परवानगी दिली आहे. परिपत्रक जारी करून यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.
या परिपत्रकानुसार, सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. मात्र या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
तसंच एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्णवेळ शाळा सूरू ठेवण्यात याव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत. तसंच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सूरू ठेवण्याची परवानगीही शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment