वेध माझा ऑनलाइन - पाटण तालुक्यातील हेलवाक प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड करण्यात आली आहे ही तोडफोड चक्क त्या केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यानेच केली आहे डॉक्टरनेच दवाखाना फोडल्याचा प्रकार पाहून अनेकजण अवाक झाले दरम्यान त्या डॉक्टरला कोयना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रात तोडफोड केली डॉक्टर महाशयांनी घातलेला हा धिंगाना पाहून रुग्ण आणि नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.. दरम्यान सदरचे वैद्यकीय अधिकारी हे मानसिक रुग्ण असल्याची चर्चा या ठिकाणी रंगली होती.. स्वतः डॉक्टरांनीच हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेली तोडफोड ही सर्वांनाच अवाक करणारी होती मनोरुग्ण असणाऱ्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कोयना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या मनोरुग्ण वैद्यकीय अधिकार्याला ताब्यात घेतले आहे.. या वैद्यकीय अधिकाऱ्याबाबत यापूर्वीही अशा अनेक तक्रारी आल्याचे सांगितले जाते..
No comments:
Post a Comment