वेध माझा ऑनलाईन - महाविकास आघाडी सरकारचे नेते ईडीच्या रडारवर असतानाच आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे ईडीच्या रडारवर असल्याचं दिसत आहे. श्रीधर पाटणकर याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
श्रीधर पाटणकर हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. 'पुष्पक ग्रुप'ची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून पुष्पक ग्रुपची 6 कोटी 45 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातल्या निलांबरी प्रोजेक्टमधल्या 11 सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सदनिकांची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख रुपये इतके असल्याची माहिती समोर आली आहे.आतापर्यंत महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते ईडीच्या रडारवर होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी, आयकर विभागाकडून छापेमारी करुन कारवाई करण्यात आली होती. पण आता थेट मुख्यमंत्र्यांचे मेहुणेच ईडीच्या रडारवल आल्याने चर्चांना उधाण आले असून एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदकिशोर चतुर्वेदी हा एन्ट्री ऑपरेटर असलेल्या नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून 30 कोटींचं कर्ज अनसिक्युअर्ड लोन श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून शेल कंपनीच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशांच्या माध्यमातून श्रीधर पाटणकर यांनी ठाण्यातील हे 11 घरांची खरेदी केली असल्याचा आरोप आहे.
No comments:
Post a Comment