Thursday, March 24, 2022

इंस्टाग्रामवरून हत्यारे मागवण्यात आली ; पुणे जिल्ह्यात सापडला अवैध शस्त्रसाठा ; गृहराज्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती...

वेध माझा ऑनलाइन -  राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा सापडल्याबाबत महत्वाची माहिती दिली. सोशल मीडियाचा वापर शस्त्र मागवण्यासाठी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  इन्स्टाग्रामवरुन ही  सर्व हत्यारं मागवण्यात आली होती, अशी माहिती देसाई यांनी विधानसभेत दिली. 

 
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा सापडल्याबाबत आमदार राहुल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना राहुल कुल  यांनी सांगितलं की, पुण्यात गावठी 5 पिस्तूल, 19 जिवंत काडतुसं सापडली. हे खूप गंभीर आहे.  पाटस आणि दौंड पोलिस स्टेशन देखील प्रलंबित आहेत, हे सुध्दा बघितले पाहिजे, असं कुल म्हणाले. 
यावर बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, आठपैकी 6 आरोपी पकडले, जे सध्या बेलवर बाहेर आहेत. परराज्यात 1 टीम पाठवली होती. पण बाकीचे आरोपी आढळले नाहीत. आता पुन्हा टीम पाठवू. इन्स्टाग्रामवरुन ही सर्व हत्यारं मागवण्यात आली होती, अशी माहिती देसाई यांनी विधानसभेत दिली. 


No comments:

Post a Comment