वेध माझा ऑनलाइन - राज्यात यंदा गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात, आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे सरकारने गुढीपाडवा साजरा करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे. आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. गुढी पाडव्याच्या मिरवणूक काढण्यात येणार आहेत. मुस्लीम बांधवांना रमजान उत्साहात साजरा करता येणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे.
No comments:
Post a Comment