वेध माझा ऑनलाइन - माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराडच्या प्रीतिसंगम उद्यानात विश्व शांतीदूत ही संकल्पना साकारत आहे याद्वारे शांतीचा संदेश देण्याचा मानस आहे कला क्रीडा साहित्य संसकृतीचा वारसा असणाऱ्या कराड नगरीत सहा ठिकाणी या कलाविष्कार दाखवणाऱ्या संकल्पना साकारण्यात येणार आहेत तसेच ज्या ठिकाणी सुशोभीकरण अद्याप झालेले नाही अशा सर्व ठिकाणी या कलाविष्कारी संकल्पना साकारल्या जाणार आहेत
यामध्ये सोमवार पेठ पाण्याची टाकी कन्याशाळा कमलेशवर कारंजे पी डी पाटील उद्यान व शिवाजी उद्यान तसेच ज्या ठिकाणी सुशोभीकरण झाले नाही अशा सर्व ठिकाणी या कलाविष्कारी संकल्पना साकारल्या जाणार आहेत अशी माहिती सी ओ डाके यांनी दिली दरम्यान याबाबतचे कामकाज पूर्वीच सुरू झाले असून प्रीतिसंगम येथील शांतिदुत संकल्पनेचे काम पूर्णत्वासही गेले आहे
कराड शहर व परिसरातून स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत असे अनेक उपक्रम होत असल्याने शहरातून या उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे
No comments:
Post a Comment