Monday, March 21, 2022

चीनमध्ये 133 जणांना घेऊन जाणारं प्रवासी विमान झाल क्रॅश ; अनेकांचा बळी गेल्याची भीती...

वेध माझा ऑनलाइन - चीनमध्ये 133 जणांना घेऊन जाणारं एक प्रवासी जेट क्रॅश झालं आहे यात अनेकांचा बळी गेल्याची भीती आहे. स्टेट ब्रॉडकास्टर सीसीटीव्हीने सोमवारी ही माहिती दिली. अपघातातील मृतांची संख्या आणि अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सीसीटीव्हीनुसार, बोइंग 737 विमान गुआंग्शी प्रदेशातील वुझोउ शहराजवळील ग्रामीण भागात कोसळलं. यानंतर डोंगराळ ठिकाणी आग लागली. घटनास्थळी बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत.

हे विमान 3 वाजेपर्यंत नियोजीत स्थळी  पोहोचणार होतं. मात्र त्याआधीच ही दुर्घटना घडली. ज्याठिकाणी हे विमान कोसळलं त्या परिसरात भीषण आग लागली. अशा स्थितीत अपघातातील मृतांचा आकडा जास्त असल्याचं मानलं जात आहे. बोइंग ७३७ मॉडेलची विमानं यापूर्वीही अनेकदा अपघाताचे बळी ठरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात 123 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स होते. या दुर्घटनेत किती जण वाचले, किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. अपघातग्रस्त विमान चीनच्या चायना इस्टर्न एअरलाइन्सचं आहे.ज्या विमानाचा अपघात झालं आहे ते केवळ साडेसहा वर्ष जुनं होतं. जून 2015 मध्ये ते एअरलाइन्सने ताब्यात घेतलं होतं. MU 5735 मध्ये एकूण 162 जागा होत्या, त्यापैकी 12 बिझनेस आणि 150 इकॉनॉमी क्लास होत्या.

No comments:

Post a Comment