वेध माझा ऑनलाइन - रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना आणखी एका लष्करी संघर्षाची भीती अधिक गडद होऊ लागली आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या युद्धखोर वृत्तीमुळं ही चिंता वाढू लागली आहे. उत्तर कोरिया शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत असून विविध शस्त्रांच्या वेगानं चाचण्या करत आहे. ताज्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या लष्करानं केला आहे. काही दिवसांपूर्वी नवीन क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाल्यानंतर उत्तर कोरियानं रविवारी अनेक लहान-श्रेणीतील रॉकेट लाँचर्स डागले.
असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरिया लवकरच आपलं सर्वात लांब पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करेल, असा अंदाज लावला जात आहे. हा देश अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं मिळवून स्वतःचा शस्त्रसाठा मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी तो दबाव आणण्याचा आणि अमेरिकेकडून सवलती मिळविण्याचा प्रयत्न करू शकतो.
याआधी बुधवारी दक्षिण कोरियानं उत्तर कोरियाच्या हवाई क्षेपणास्त्र स्फोटात उत्तर कोरियाच्या सर्वात मोठे शस्त्र असलेल्या ह्वासाँग-17 क्षेपणास्त्राचे काही भाग असल्याचे सांगितले. आता रविवारी दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, त्यांना कळलं आहे की, उत्तर कोरियानं पश्चिम किनारपट्टीवरून अनेक रॉकेट सोडले आहेत. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, आमचं सैन्य उत्तर कोरियाच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्करी प्रमुखांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आज सकाळी उत्तर कोरियामध्ये गोळीबार झाला असून त्यात अनेक रॉकेट लाँचर डागण्यात आले आहेत. आमचं सैन्य संबंधित परिस्थितीवर लक्ष ठेवून होतं आणि कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज होतं. योनहाप या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या लष्करानं पश्चिम किनार्याजवळ दक्षिण प्योंगन प्रांतातील एका अज्ञात ठिकाणी सकाळी 7.20 च्या सुमारास सुमारे एका तासभरात 4 वेळा गोळीबार केला.
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं या प्रक्षेपणांबाबत उप-मंत्रालयाची आपात्कालीन बैठक घेतली. लष्करी शक्ती आणि सहकार्याच्या आघाडीवर दक्षिण कोरिया आपला सहकारी देश अमेरिकेसोबत काम करत असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलंय.
No comments:
Post a Comment