वेध माझा ऑनलाइन - भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कोळे (ता. कराड) येथे आज बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शासकीय नियमांचे पालन करून ही शर्यत होणार आहे.
डॉ. अतुलबाबा भोसले युवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यतीत प्रथम विजेत्यास हॉटेल रॉयल लँडस्केप (विंग) यांच्यावतीने ५१,१११ रुपयांचे रोख बक्षिस, द्वितीय क्रमांकास अनन्या इन्फ्रास्ट्रक्चर (संजयनगर-शेरे) यांच्यातर्फे ४१,१११ रुपये, तृतीय क्रमांकास कृष्णा बँकेचे संचालक हेमंत पाटील यांच्याकडून ३१,१११ रुपये, चतुर्थ क्रमांकास कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव यांच्यातर्फे २१,१११ रुपये, पाचव्या क्रमांकास कोळेवाडीच्या नेमाने बापू यांच्यातर्फे ११,१११ रुपये तर सहाव्या क्रमांकासाठी भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्यातर्फे ७,१११ रुपयांचे रोख बक्षिस देण्यात येणार आहेत. बैलगाडी मालकांनी शासकीय नियमांनुसार स्पर्धेचे नियम व अटींचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment