Monday, March 21, 2022

नामदार शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थानासमोर जमावाकडून गोंधळ...

वेध माझा ऑनलाईन - साताऱ्यातील पोवई नाक्यावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर आज, सोमवारी जमावाकडून गोंधळ घालण्यात आला. यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारच्या सुमारास गृहराज्यमंत्री देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थानासमोरील रस्त्यावर काही लोक गोंधळ घालू लागले. जोरात आरडाओरडा सुरू झाला. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीलाही व्यत्यय आला. गोंधळ सुरू झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.

यादरम्यान, एका व्यक्तीने विषारी औषध खाल्ल्याचे सांगण्यात येत आहे.  त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशीही माहिती मिळाली. याबाबत सायंकाळी चारपर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला होता.  याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

No comments:

Post a Comment